Ad will apear here
Next
रत्नागिरीतील भाट्ये पुलावरून झिपलाइन, रॅपलिंग
रत्नदुर्ग माउंटेनीअर्स संस्थेचा उपक्रम


रत्नागिरी :
महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून, दोन ऑक्टोबर २०१८ रोजी रत्नदुर्ग माउंटेनीअर्स संस्थेने रत्नागिरीतील भाट्ये पुलावरून झिपलाइन व रॅपलिंग या दोन साहसी क्रीडा प्रकारांचे आयोजन केले होते. रत्नागिरीतील पर्यटनवाढीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. याकरिता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने त्यांना प्रोत्साहन दिले आहे.

नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यटन दिनी रत्नदुर्ग माउंटेनीअर्स संस्थेचा हृद्य सत्कारही करण्यात आला आहे. ‘रत्नदुर्ग’तर्फे भाट्ये टेबल पॉइंट येथे व्हॅली क्रॉसिंग, तसेच रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेतील पर्यटनाचा आस्वाद अनेक पर्यटकांनी घेतला आहे. आता भाट्ये पुलावरून झिपलाइन व रॅपलिंग या नव्या अॅक्टिव्हिटी सुरू झाल्या.



या साहसी क्रीडा प्रकारांचा आनंद ‘एमटीडीसी’चे रत्नागिरीतील वरिष्ठ व्यवस्थापक जगदीश चव्हाण व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घेतला. या वेळी नगराध्यक्ष राहुल पंडित यांनीही उपस्थित राहून ‘रत्नदुर्ग’च्या कार्याचे कौतुक केले आणि स्वतःही या खेळांचा आनंद लुटला. या वेळी त्यांच्या मातोश्रीसुद्धा आल्या होत्या. या क्रीडा प्रकारांचा आनंद रत्नागिरीतील ३० नागरिक आणि लहान मुलांनी लुटला. 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रत्नदुर्ग माउंटेनीअर्सचे फिल्ड इन्चार्ज जितेंद्र शिंदे, गणेश चौघुले, अध्यक्ष शेखर मुकादम, उपाध्यक्ष वीरेंद्र वणजू, उपाध्यक्षा नेत्रा राजेशिर्के, सेक्रेटरी संजय खामकर व पराग सुर्वे, किशोर सावंत, हर्ष जैन, प्राजक्ता राऊत, प्रांजली चोप्रा, त्रिविक्रम शेंडे, हर्षल चौघुले, संतोष दैत, शैलेश नार्वेकर, नित्यानंद भुते या सभासदांनी मेहनत घेतली.

(रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्यासह अनेकांनी साहसी खेळांचा आनंद कसा लुटला ते पाहा सोबतच्या व्हिडिओत. रत्नदुर्ग माउंटेनीअर्स या संस्थेच्या उपक्रमांबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZXNBT
Similar Posts
रत्नदुर्ग किल्ल्यावर मुलांनी गिरवले धाडसाचे धडे रत्नागिरी : गिर्यारोहण क्षेत्रात रत्नागिरीत कार्यरत असलेल्या रत्नदुर्ग माउंटेनीअर्स या संस्थेने नुकतेच रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने संस्थेने मुला-मुलींसाठी रत्नदुर्ग किल्ल्यावर तीन दिवसांच्या साहसी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या प्रशिक्षण शिबिरात स्थानिक मुला-मुलींसह मुंबई,
रत्नागिरीत ‘झिपलाइन’ला मुलांचा प्रतिसाद रत्नागिरी : रत्नदुर्ग माउंटेनीअर्स या संस्थेतर्फे प्रजासत्ताकदिनी भाट्ये पुलावरून भाट्ये किनार्‍यापर्यंत झिपलाइन या गिर्यारोहणातील साहसी क्रीडा प्रकाराचे आयोजन केले. संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त संस्थेने अनेक साहसी उपक्रम हाती घेतले आहेत.
प्रजासत्ताक दिनी मुले अनुभवणार ‘झिपलाइन’चा थरार रत्नागिरी : येथील रत्नदुर्ग माउंटेनीअर्सतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी २०१९ रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत शहरातील भाट्ये पुलावरून रॅपलिंगचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी संस्था २५ व्या वर्षांत पदार्पण करीत असल्याने खास आठ ते १८ वयोगटांतील मुलांना झिपलाइन (Zipline) हा साहसी क्रीडा प्रकार अनुभवता येणार आहे
रमणीय रत्नागिरीत पर्यटकांसाठी पर्वणी रत्नागिरी : रम्य कोकणातील रमणीय रत्नागिरी आणि आसपासचा परिसर पाहून हरखून जाणाऱ्या पर्यटकांना आता तेथील निसर्गसौंदर्याचा आणखी आस्वाद घेता येणार आहे. उंच कड्यावरून खाली अथांग पसरलेल्या समुद्राकडे झेप घेता येणाऱ्या ‘सी-व्हॅली क्रॉसिंग’पासून समुद्राखालच्या रंगीबेरंगी दुनियेचे दर्शन घडविणाऱ्या स्कूबा डायव्हिंगपर्यंतच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language